सिंहा लोकनें करुन । ऐक पुढील कथन। तंतूक संसारीं असून । भजे गुरुसी याममात्र ॥१॥
तल्लोक श्रीशैलासी । जातां बोलविती त्यासी । तया वदे तो गुरुपाशीं । श्रीशैलेशमल्लिकार्जुन ॥२॥
तो पाय वंदी त्यासी । गुरु पुसे का जासी । तो तसेंचि सांग त्यासी । चतुर्दशी पुढें आली ॥४॥
नभो मार्गे गुरुतया । नेउनी दाविती श्रीशैल्य । देवा पाहे तो लोक तया । पुसोनी साच न मानीं ॥५॥
आलंबिलें मांस पाहून । श्रीशैलाग्रीं धार येऊन। तुजला मारी म्हणून । राणी होवून रमसीं ॥८॥
तूं मी भविष्यड्जन्मीं । होवूं राजे, अंती स्वधामी । जावूं म्हणे, तंतुकामीं । क्षेत्रधामी आणिले तुला ॥