दत्त जयंती विशेष : भगवान दत्तात्रेय यांची जन्म कथा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (08:53 IST)
महायोगीश्वर दत्तात्रेय भगवान हे श्री हरी विष्णूंचे अवतार आहे. हे मार्गशीर्षाच्या पौर्णिमेच्या प्रदोषकाळात अवतरले होते. या दिवशी दत्त जयंती मोठ्या सोहळ्याने साजरी केली जाते.
श्रीमद्भागवतात असे म्हटले आहे की अपत्य प्राप्तीच्या इच्छेने महर्षी अत्री ह्यांनी उपवास केल्यावर 'दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः' मी स्वतःला आपल्याला दिले -विष्णूंनी असे म्हटल्यावर विष्णूच अत्रीच्या मुलाच्या रूपात अवतरले आणि दत्त म्हणवले. अत्रिपुत्र असल्यामुळे हे आत्रेय म्हणवले. दत्त आणि आत्रेय ह्यांचा संयोगाने ह्यांचे नाव दत्तात्रेय प्रख्यात झाले.
ह्यांच्या आईचे नाव अनुसूया आहे, त्यांचे नाव पतिव्रत धर्मासाठी अग्रणी घेतले जाते. पुराणात एक आख्यायिका आहे की ब्रह्माणी, रुद्राणी आणि लक्ष्मीला आपल्या पतिव्रत धर्माचे गर्व झाले होते. भगवंताला कधीही आपल्या भक्ताचे अभिमान सहन होत नाही म्हणून त्यांनी एक आश्चर्यकारक लीला करण्याचा विचार केला.
भक्त वत्सल भगवंतांनी देवर्षि नारद ह्यांच्या मनात एक प्रेरणा उत्पन्न केली. नारद फिरत-फिरत देवलोकात गेले आणि तिन्ही देवींकडे आळी-पाळीने जाऊन म्हणाले- अत्रीपत्नी अनुसूयाच्या समोर आपले सतीत्व नगण्य आहे. तिन्ही देवींनी आपल्या स्वामींना म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्यांना देवर्षि नारदाची ही गोष्ट सांगितली आणि अनुसूयाच्या सतीत्वाची परीक्षा घेण्यास सांगितले.
देवांनी त्यांना खूप समजावले पण त्यांच्या हट्टीपणाच्या समोर देवांचे काहीही चालले नाही. शेवटी ते साधुवेष घेऊन त्यांच्या आश्रमात गेले. महर्षी अत्री त्यावेळी आश्रमात नव्हते. पाहुणे घरी आलेले बघून देवी अनुसूयेने त्यांना नमन करून अर्घ्य, कंदमूळ अर्पण केले पण ते म्हणाले की 'आम्ही तो पर्यंत अन्नाला ग्रहण करणार नाही जो पर्यंत आपण आम्हाला आपल्या मांडीत घेऊन भरवत नाही.
हे एकून देवी अनुसूयाला आश्चर्य झाले पण तिला आतिथ्य धर्म गमवायचे नव्हते, म्हणून त्यांनी नारायणाचे आणि आपल्या पतीचे स्मरण केले आणि ह्याला भगवंतांची इच्छा मानून त्या म्हणाल्या की - जर माझे पतिव्रत धर्म खरे आहेत तर हे तिन्ही अतिथी सहा-सहा महिन्याचे बाळ व्हावे. त्यांचे एवढेच म्हणणे होते की ते तिन्ही देव सहा-सहा महिन्याचे बाळ झाले आणि रडू लागले. तेव्हा अनुसूया मातेने त्यांना आपल्या मांडीत घेऊन दूध पाजले आणि पाळण्यात घातले.
बराच काळ गेला. देव लोकात ते तिन्ही देव परतले नाही म्हणून तिन्ही देवी खूप विचलित झाल्या. परिणामी नारद आले आणि त्यांनी घडलेले सर्व काही सांगितले. तिन्ही देवी अनुसूया कडे परत आल्या आणि घडलेल्या प्रकाराची क्षमा मागितली.
देवी अनुसुयाने आपल्या पतिव्रत धर्मामुळे तिन्ही देवांना त्यांच्या रूपात परत केले. तिन्ही देवांनी त्यांना वर मागण्यास सांगितले तर ते म्हणाले की आपण तिन्ही देव मला मुलांचा रूपात प्राप्त व्हावे. देवांनी 'तथास्तु' म्हणून आपल्या देवलोकात निघून गेले.
काळांतरानंतर हे तिन्ही देव अनुसूयाच्या गर्भातून प्रकट झाले. ब्रह्माच्या अंशातून चंद्र, शंकराच्या अंशातून दुर्वासा आणि विष्णूच्या अंशातून दत्तात्रेय जन्मले. दत्त भगवान हे श्री विष्णू भगवान चे अवतार आहे आणि ह्यांच्या जन्माची तिथी दत्त जयंतीच्या नावाने प्रख्यात आहे.