वर्ल्डकप विजेत्या टीमला आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम

शनिवार, 18 मे 2019 (10:11 IST)
आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या बक्षीसं जाहीर केले आहे. यात वर्ल्डकप विजेत्या टीमला ४० लाख अमेरिकन डॉलर्सच बक्षीस जाहीर केलं आहे. ४० लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे जवळपास २८ कोटी रुपये. त्यामुळे विजेती टीम चांगलीच मालामाल होणार आहे. तसेच उपविजेत्या टीमसाठी आयसीसीकडून ८ लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार आहे. आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेली रक्कम ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम ठरली आहे.
 
वर्ल्डकप स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया वर्ल्डकपसाठी २२ मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. वर्ल्डकपसाठी १५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. २३ तारखेला इंग्लंडला १४ खेळाडू जाणार हे निश्चित आहे. पंरतु केदार जाधवला झालेल्या दुखापतीमुळे तो जाणार की नाही, याबाबत शंका आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती