भारताचा संघ या विश्वचषक स्पर्धेचा संभाव्य दावेदार आहे, असेही राजपूत यांना वाटते. विश्वचषक स्पर्धेत दहा संघ आहेत. या सर्व संघातील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताच्या गोलंदाजीची बाजू मजबूत व सर्वोत्तम आहे. त्यामुळे भारत विजेतेपदाचा दावेदार आहे असे ते म्हणाले.
2007 साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली पहिलीच टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली. या विजेत्या संघाचे राजपूत हे क्रिकेट व्यवस्थापक होते. शिखर धवन, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली हे टॉप तीन फलंदाज या संघात आहेत.
2007 च्या आणि सध्याच्या विश्वचषक संघात काय साम्य आहे असे विचारले असता राजपूत उत्तरले की, सध्याच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. एकदिवसी स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूंचा वाटा महत्त्वाचा ठरतो. पहिले तीन खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू यांच्यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून आहे असे ते म्हणाले.