हे अॅप्स करतात चॅनल स्ट्रिमिंग
मोबाइल अॅप्स जसे हॉटस्टार, एअरटेल टीव्ही, जिओ टीव्ही, सोनी लिव्ह, एमएक्स प्लेयर, जी5 अनेक चॅनल्सची लाइव्ह स्ट्रिमिंग करतात. आता यांना देखील ब्रॉडकास्टिंग कंपन्यांप्रमाणे लायसेंस घ्यावं लागेल.
मोफत होते स्ट्रिमिंग
सध्या या मोबाइल अॅप्सवर टीव्ही चॅनल्सची स्ट्रिमिंग मोफत होते. हे अॅप्स ट्राय नियंत्रण करत नाही. ट्राय प्रमाणे त्याने ब्रॉडकास्टिंग कंपन्यांना लायसेंस दिले आहे की त्याने आपलं कंटेट केबल ऑपरेटर किंवा डीटीएच कंपन्यांना द्यावे. परंतू मोबाइल अॅप्स जसे तिसरी पार्टी मोफत चॅनल्स दाखवत तर चुकीचे आहे. म्हणून आता या मोबाइल अॅप्सला देखील लायसेंस घ्यावे लागणार.
ग्राहकांवर प्रभाव
जर ट्रायने हे मोबाइल अॅप्स लायसेंसच्या मर्यादेत घेतले तर लोकं फ्रीमध्ये कोणतेही चॅनल बघू शकणार नाही. प्रत्येक अॅपसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतील. हे महागात पडू शकतं. ट्रायच्या या पाउलामुळे लोकं मोबाइलवर टीव्ही बघणे बंद करू शकतात. सध्या मेट्रो सिटीजमध्ये लोक आपले आवडते प्रोग्राम मोबाईल अॅपवर बघणे पसंत करतात.