टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार मानल्या जाणार्या महेंद्रसिंग धोनीने काल वर्ल्ड कपमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. आयर्लडला नमवून यंदाच्या वर्ल्ड कपमधील सलग पाचवा विजय साकारणारी धोनीसेना 2011 च्या वर्ल्ड कपपासून सलग नऊ सामने जिंकली आहे. याआधी 2003च्या वर्ल्ड कपमध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग आठ सामने जिंकले होते. हा विक्रम धोनीने मोडला आहे
2011च्या वर्ल्डकपमधील शेवटचे चार सामने धोनी ब्रिगेडने जिंकले होते. त्यानंतर, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सलग पाच सामन्यात त्यांचा पराभव झालेला नाही. म्हणजेच, वर्ल्ड कपमधील सलग नऊ सामने भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत.