जबरदस्त आत्मविश्वासामागे लपलेला चेहरा

गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (14:28 IST)
वर्ल्डकप क्रिकेटमध्ये शिखर धवन शानदार खेळी करतोय, मात्र त्याच्या यशाचं श्रेय हिसकावण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीजचा महान गोलंदाज मायकल होल्डिंगने केला आहे. मायकल होल्डिंग म्हणतो की, डावखुरा फलंदाज शिखर धवन हा भाग्यशाली आहे, कारण त्याच्या आजूबाजूचे सदस्य समजदार आहेत, ते चांगल्या मेंटरची भूमिका पार पाडतात.
 
ट्राय सीरिजमध्ये शिखर धवनने खराब प्रदर्शन केल्यानंतर, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात 73 धावांची खेळी करून शिखरला सूर गवसला आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात 137 धावा ठोकून त्याने पूल बी मध्ये भारताला दुसरा विजय मिळवून दिला.
 
होल्डिंग म्हणतो, कोच डंकन फ्लेचर, टीम निर्देशक रवी शास्त्री आणि कप्तान महेंद्रसिंग धोनीसारख्या लोकांनी, नेहमी धवनसारख्या प्रतिभाशाली खेळाडूंना मोठं होण्यासाठी साथ दिली आहे.
 
कोच डंकन फ्लेचर, रवी शास्त्री, महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटचे जाणकार लोक आहेत, ते घाबरून जात नाहीत, ते क्रिकेटला ओळखतात, क्रिकेटरची क्षमता ते ओळखतात, ते योग्य त्या खेळाडूंना संधी देऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढवतात.
 
होल्डिंग म्हणाला, इमानदारीत सांगू, मागील सहा-सात वर्षात टीम इंडिया मागील 15 वर्षाच्या तुलनेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतेय आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगली फिल्डिंग सहसा कुणाचीही होत नाही, मात्र टीम इंडिया क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेला टक्कर देतेय. भारताचे पुढील सामने युएई, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज या संघाशी होणार आहेत. तंना हरवून भारत आणखी पुढे जाईल, असा दावादेखील त्यांनी   केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा