या लोकांना कोरोना लसीसाठी 9 महिने थांबावे लागणार ? नवीन नियम जाणून घ्या

मंगळवार, 18 मे 2021 (16:05 IST)
कोरोना होऊन गेलाय, आता लस कधी घेऊ शकतो हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे? यावर उत्तर म्हणजे नवीन नियमाप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला रिकव्हर होऊन नऊ महिने झाल्यानंतरच लस घेता येणार आहे. नॅशनल ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन (NEGVAC) लवकरच याबाबत निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. 
 
एखाद्या व्यक्तीने कोरोनावर मात केल्यानंतर त्याच्या शरीरात अँटिबॉडी तयार होतात. या अँटिबॉडी पुढील काही महिने त्याचे कोरोनापासून रक्षण करतात. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना 9 महिन्यांनंतर लसीचा डोस द्यावा, अशी शिफारस NEGVAC याबद्दलचा निर्णय घेण्याचा शक्यता आहे. अनेक बाबींची पडताळणी केल्यानंतर तज्ज्ञांच्या टीमनं हा सल्ला दिला आहे. 
 
लसीकरणाबाबतच्या नियमांमध्ये सतत बदल होत आहेत. नुकतंच रिकव्हरीनंतर लसीकरणाचा कालावधी सहा महिने करण्यात आला होता. मात्र, आता हा आणखी वाढवून 9 महिने करण्याची शक्यता आहे.
 
NIAGI च्या या सल्ल्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही सूचना आता केंद्र सरकारकडे पाठवली आहे. NIAGI ने हा सल्ला देण्यापूर्वी कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसबाबतही महत्वाची सूचना केली होती. कोविशील्ड लसीच्या दोन्ही डोस मधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर सरकारकडून त्याची अंमलबजावणी झाली आहे.
 
कोविन पोर्टलवरही आता दुसऱ्या डोससाठीचा पर्याय 84 दिवसांनंतरच दिसत आहे. तर, कोरोनातून रिकव्हर झालेल्या व्यक्तींना पहिले सहा महिने लस घेता येणार नव्हती. मात्र, आता हा काळ आणखी वाढवून 9 महिने केला जाऊ शकतो. तर, गर्भवती महिलांकडे डिलेव्हरीनंतर लस घेण्याचा पर्याय आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती