जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचे ६ महत्त्वाचे निकष सांगितले आहेत. ज्यानंतरच कोणत्याही देशाने, राज्याने किंवा जिल्ह्याने लॉकडाऊन काढण्याचा निर्णय घ्यावा, असं WHOनं सांगितलं आहे. जागतिक स्तरावर आत्तापर्यंत ३५ लाख कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून तब्बल अडीच लाख लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवाले लागले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत रोज सरासरी ८० हजार कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती WHOच्या प्रमुखांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काढण्याचा निर्णय धोकादायक ठरू शकतो, अशी भिती देखील डब्लूएचओने व्यक्त केली आहे.