नाशिक: शहरात उद्या (दि ४) रोजी संपूर्ण लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून नाशकात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद पडले होते. काल (दि ०२) रोजी नाशिक जिल्ह्यासह शहराला ५७ हजार लसी प्राप्त झाल्या. यानंतर आज (दि ०३) रोजी सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागांसह शहरात लसीकरण पार पडले....
शासकीय अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार दोन दिवस पुरेल इतका लसींचा साठा नाशिकला मिळाल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या आठवड्यात रविवारीदेखील लसीकरण सुरु राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उद्या पूर्णदिवस लसीकरण बंद राहणार आहे.