रत्नागिरी जिल्ह्यात दोन नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण आढळले

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (15:59 IST)
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. राज्यात याचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात दोन नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आलेत. दोन्ही रूग्ण हे संगमेश्वर तालुक्यातील असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 
दरम्यान,राज्यात आणखी एका जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत.याआधी नाशिकमध्येही रुग्ण आढळले होते.आता जळगाव जिल्हयात डेल्टा प्लसचे रूग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण आहे. डेल्टाचे रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांचे रक्ताचे नमुने संकलित करून ते NIV कडे तपासणीसाठी त्यात डेल्टा प्लसचे सात रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली. तर,डेल्टा प्लसचे रूग्ण बरे होत असल्याचं आरोग्य विभागाने सांगितले. 
 
राज्यात 12 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे 45 रुग्ण आढळून आले असले तरी घाबरुन जाण्याची परिस्थिती नाही. राज्यात प्रत्येक 100 रुग्णांमागे 0.5 रुग्णांमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळून आलेत. 8 हजार तपासण्यांमधून हा निष्कर्ष समोर आलाय. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती