२ हजार ३५४ रुग्णांवर उपचार सुरू –आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

गुरूवार, 25 जून 2020 (08:20 IST)
राज्यात  ४१६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ७३ हजार  ७९२ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५१.६४ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ३८९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ३५४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
 
आज सोडण्यात आलेल्या ४१६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ३५३० (आतापर्यंत एकूण ५१ हजार ७३७) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ३५५ (आतापर्यंत एकूण ११ हजार २९९), नाशिक मंडळात १३९ (आतापर्यंत एकूण ३६५२), औरंगाबाद मंडळ २१ (आतापर्यंत एकूण २५६२), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १३८३), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ५३२), अकोला मंडळ २६ (आतापर्यंत एकूण १४४८), नागपूर मंडळ ५९ (आतापर्यंत एकूण ११७९) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख २३ हजार ७७५ नमुन्यांपैकी १ लाख ४२ हजार ९०० नमुने पॉझिटिव्ह (१७.३४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५७ हजार  ९४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ५८१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात आज २०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७२ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.  सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.७२ टक्के एवढा आहे.
 
मागील ४८ तासात झालेले ७२ मृत्यू हे मुंबई मनपा-३८, ठाणे मनपा-१, कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, नाशिक मनपा-४, जळगाव-१, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर मनपा-४, रत्नागिरी-२, जालना-१, उस्मानाबाद-२, अकोला मनपा-२, बुलढाणा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती