राज्यामध्ये सोमवारी 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (08:58 IST)
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरुच आहे.राज्यामध्ये सोमवारी 2583 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर 3836 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 40 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.18 टक्के आहे. राज्यात सध्या 41672  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
राज्यात 2583 नवीन रुग्णांचे निदान झाले तर राज्यात 28 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 % एवढा आहे.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 57164401 प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी 6524498 (11.41टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 275736 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1677 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती