राज्यात नव्या बाधितांची संख्या तीन हजारांच्या खाली; ४१ मृत्यू!२ हजार ६९२ नवे बाधित आढळून आले आहेत

सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (08:04 IST)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या बाधितांची संख्या सातत्याने तीन हजार किंवा त्यापेक्षा अधिक आढळून येत होती. मात्र गेल्या आठवड्यापासून ही संख्या तीन हजारांच्या आत आली असल्याने, कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरत असल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नव्या बाधितांच्या तुलनेत सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून येऊ लागल्याने, आरोग्य यंत्रणेवर ताण काहीसा कमी हाेताना दिसत आहे.
 
रविवारी राज्यात दिवसभरात २ हजार ७१६ रुग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ६९२ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ४१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८०,६७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.२८ टक्के एवढे झाले आहे.
 
आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६५,५९,३४९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३९२०७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९२,२२,२६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,५९,३४९ (११.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४३,१५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३५,८८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती