ब्लॅक फंगस चे मुंबईत पहिले प्रकरण समोर आले

शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (15:39 IST)
भारताला कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसला आहे आणि देशातील ओमिक्रॉन व्हेरियंट वेगाने पूर्वीच्या डेल्टा व्हेरियंट ची जागा घेत आहे. तिसर्‍या लाटेमुळे पुन्हा एकदा म्युकोर्मायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसची भीतीही सतावू लागली आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात, जेव्हा डेल्टा प्रकारामुळे कोरोनाची दुसरी लाट आली त्यावेळी या दुर्मिळ ब्लॅक फंगस नेही पाय पसरले. ब्लॅक फंगस मुळे अनेकांचा मृत्यू झाला. यामुळे अंधत्व येणे, अनेक अवयवांचे कार्य न होणे, शरीरातील ऊतींचे नुकसान होणे, तसेच वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यूही होतो
 
गेल्या वर्षी दुसऱ्या लाटेत कोणत्याही आजारामुळे दीर्घकाळ औषधे किंवा स्टेरॉईड घेणारे लोक काळ्या बुरशीचे जास्त बळी पडले. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे , ज्यांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे किंवा जे बराच काळ व्हेंटिलेटरवर राहिले आहेत, त्यांना ब्लॅक फंगस चा धोका जास्त असतो. डोळे, नाक, तोंड यासारख्या शरीरात प्रवेश करणार्‍या मार्गांद्वारे शरीरात प्रवेश करून फुफ्फुसांवर देखील परिणाम करू शकतो.
 
नुकतेच मुंबईत ब्लॅक फंगसचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील एका 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल 5 जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर 12 जानेवारी रोजी वृद्धामध्ये काळ्या बुरशीची लक्षणे दिसू लागली. त्यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती