बिहारची राजधानी पाटणा येथे हा घडलेला प्रकार आहे. येथील आयजीआयएमएस रुग्णालयात एक 60 वर्षीय रुग्णावर शस्त्र क्रिया करून तब्ब्ल क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया 3 तास चालली. हा चेंडू एवढा ब्लॅक फंगस काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. सर्वत्र या ब्लॅक फंगस बद्दल चर्चा होत आहे.
शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या टीमच्या म्हणण्यानुसार ही शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती. कारण मेंदुत काळ्या बुरशीचं जाळं पसरलं होतं. आयजीआयएमएसचे चिकित्सा अधिक्षक डॉ. मनीष मंडल यांनी सांगितलं की, "जमुई येथे राहणाऱ्या 60 वर्षीय अनिल कुमार यांना सारखी चक्कर येत होती. त्यात ते वारंवार बेशुद्धावस्थेत जात होते. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत जात होती. चाचणीतून ब्लॅक फंगस असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर त्यांना या शस्त्रक्रियेत यश मिळाले आहे.