वाचा, ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन देशात कसे होणार

मंगळवार, 7 जुलै 2020 (16:31 IST)
कोरोनावर ‘रेमडेसिवीर’ हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. दरम्यान, आता या औषधाचं उत्पादन भारतात होणार आहे. यासह या औषधाची विक्रीही करता येणार आहे. भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. 
 
दरम्यान Mylan NV या औषधी कंपनीने  सांगितले की, Gilead Sciences अँटीव्हायरल ड्रग ‘रेमडेसिवीर’चे जेनेरिक व्हर्जन भारतात लाँच करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्याची किंमत ४ हजार ८०० रुपये असणार आहे. ज्याची किंमत विकसित देशांच्या तुलनेत ८० टक्के कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
तसेच, कॅलिफोर्नियास्थित गिलियडने १२७ विकसनशील देशांमध्ये ‘रेमडेसिवीर’ औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अनेक जेनेरिक औषध उत्पादकांशी परवाना देण्याचे सौदे केले आहेत. Mylan पूर्वी, सिप्ला लिमिटेड आणि हेटरो लॅब लिमिटेड या दोन भारतीय औषधी कंपन्यांनीही गेल्या महिन्यात या औषधाची जेनेरिक व्हर्जन बाजारात आणली आहे.
 
सिप्ला कंपनी आपल्या या व्हर्जनला ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीला देणार आहे तर, तर हेटरोने त्याच्या जेनेरिक व्हर्जन कोविफोरची किंमत ५ हजार ४०० रूपये ठेवली आहे. गेल्या आठवड्यात गिलियडने विकसित देशांकरिता ‘रेमडेसिवीर’ची किंमत प्रति रुग्णांना २ हजार ३४० डॉलर्स ठेवली असून पुढील तीन महिने संपूर्ण औषध अमेरिकेला पुरविण्याचे मान्य केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती