औरंगाबादहून पुण्याला कोरोना रुग्ण कार्डियाक अ‍ॅम्बुलन्सने रवाना

गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (15:54 IST)
औरंगाबाद शहरात मागील तीन दिवसांपासून शहरातील एकाही रुग्णालयात आयसीयूमध्ये बेड उपलब्ध झाले नाही. त्यामुळे कोविड, नॉनकोविड रुग्णांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे औरंगाबादहून पुण्याला रुग्ण कार्डियाक अ‍ॅम्बुलन्सने निघाले  आहेत. 
 
औरंगाबाद शहरात प्रमुख १६ लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये आयसीयूत फक्त ३२६ बेड उपलब्ध आहेत. आता तर एकही बेड रिकामा नाही. हे बेड मिळविण्यासाठी रुग्णांची प्रचंड मोठी रांग लागलेली आहे. रुग्णाला डोळ्यांसमोर मृत्यूच्या खाईत ढकलण्यापेक्षा इतर शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्यासाठी नातेवाईकांची धडपड सुरू झाली आहे. 
 
यामध्ये २ दिवसांपूर्वी शहरातील हिमायतबाग भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला न्यूमोनिया झाला. कोरोना तपासणी निगेटिव्ह आली. रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासू लागली. शहरात एकाही रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. नातेवाईकांनी बरीच मेहनत घेतल्यानंतर पुण्यात पिंपरी चिंचवड येथे एका रुग्णालयात बेड उपलब्ध झाले. पुण्याहून खास कार्डियाक अ‍ॅम्बुलन्स मागून रुग्णाला शिफ्ट करण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती