गोव्यात ऑक्सिजन पुरवठ्यावरुन गोंधळ, एका दिवसात 75 मृत्यूंची नोंद

शुक्रवार, 14 मे 2021 (16:20 IST)
ऑक्सिजन आणि कोव्हिड रुग्ण व्यवस्थापनावरून गोव्यातला असंतोष वाढत असून ऑक्सिजन पुरवठा ही गोव्याची सर्वांत मोठा चिंता बनलेली आहे. गोव्याने बुधवारी एका दिवसात 75 कोविड मृत्यूंची नोंद केली गेली. ही आजपर्यंत एका दिवसातली सर्वाधिक नोंद आहे.
 
ऑक्सिजन पुरवठा ही गोव्याची सर्वांत मोठा चिंता बनलेली असून आता मुंबई उच्च न्यायालयानेही त्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. तर गोवा मेडिकल कॉलेजमधल्या ऑक्सिजन पुरवठाविषयक अडचणींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करत असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.
 
पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या ४ दिवसात या रुग्णालयात ७४ रुग्णांनी जीव गमावला आहे. ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 
 
देशात सर्वाधिक पॉझिटीव्हिटी रेट हा गोव्यात आहे. गुरुवारी रुग्ण वाढीचा दर ४८.१ टक्के इतका होता. गेल्या २४ तासात गोव्यात २ हजार ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती