राज्यात ओमायक्रॉनच्या जेएन1 सब-व्हेरिएंटने शिरकाव केला

बुधवार, 20 डिसेंबर 2023 (21:22 IST)
कोरोनाच्या नव्या व्हेरिंएटने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या जेएन1 सब-व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. सिंधुदुर्गातील 41 वर्षीय पुरुषाला जेएन1 ची लागण झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
 
नव्या व्हेरिएंटच्या शिरकावानंतर जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. इन्फुएन्झा आणि सारीचे सर्व्हेक्षण अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सोबतच, कोव्हिड चाचण्या वाढवण्यासंदर्भात देखील आदेश दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
 
केरळात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. राज्यात सध्या 45 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातच एकूण 14 रुग्णांचे निदान झाले आहे.  याचं प्रमुख कारण म्हणजे जेएन1 हा नव्याने आलेला व्हेरीयंट असल्याचं बोललं जात आहे. यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली असून घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती