मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. विशेष म्हणजे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना मृतांची संख्या शून्य झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेनुसार, मुंबईत शुक्रवारी 202 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे ही बाब मुंबईकरांसाठी कुठे तरी मोठी दिलासादायक आहे. मुंबईत 365 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत नोंद झालेल्या 202 रुग्णांपैकी 26 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 6 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेकडील 36 हजार 319 बेड्सपैकी केवळ 838 बेडचा वापर करण्यात आला आहे.
मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण 10 लाख 33 हजार 862 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा प्रमाण हे 98 टक्के झाले आहे. तर मुंबईत आज एकूण 1 हजार 780 रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा 2 हजार 627 दिवसांचा आहे. तर मुंबईत 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत रुग्णवाढ ०.०३ टक्के इतकी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. सध्या मुंबईत एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नाही तसेच एकही सील इमारत नाही.