New COVID Variant:सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. आता भारतात या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला असून मुंबईत कोरोनाच्या नवीन व्हेरियंट एरिस चा पहिला रुग्ण आढळला आहे. एरिस व्हेरियंट कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सबव्हेरियंट-EG.5.1 आहे. याची लक्षणे ओमायक्रॉन सारखी असतात. घसा खवखवणे, नाक चोंदणे, नाक वाहणे, कोरडा खोकला, शिंका येणे, कफयुक्त खोकला येणे, डोकं दुखी, अंगदुखी, स्नायूत वेदना होणे, दम लागणे, श्वास लागणे, वास कमी येणे आहे. सध्या पावसाळ्यात या आजाराचा प्रभाव वाढू शकतो. असे डॉक्टर सांगतात.
गेल्या काही दिवसांपासून जवळपास नाहीसा झालेल्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोर पकडला आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. यासोबतच कोरोना ओमायक्रॉन EG.5.1 चे नवीन व्हेरियंट देखील सापडले आहेत. देशात प्रथमच या व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला आहे. तज्ज्ञाच्या मते, मे महिन्यात ओमायक्रॉन EG.5.1 व्हेरियंट शोधला.राज्यात गेल्या दोन महिन्यांत फक्त XBB.1.16 आणि XBB.2.3 व्हेरियंट आढळून आले आहेत.
अद्याप देशभरात ओमायक्रॉनच्या EG.5.1 व्हेरियंट चे फारसे रुग्ण आढळलेले नाहीत. मात्र, रुग्णालयात दाखल झालेल्या नवीन कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 43 सक्रिय रुग्ण आहेत. यानंतर पुण्यात 34 आणि ठाण्यात 25 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघरमध्ये प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे.