यामुळे आता राज्यसरकारने आणि मुंबई महापालिकेने नियमित केलेल दर आणि पीपीई किटच्या किंमतीच्या वर जर कोणी रूग्णांकडून जास्त दर आकारले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ज्या रूग्णाच्या नातेवाईकांना आपले बिल राज्यसरकार आणि मुंबई महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा जर कोणी जास्त आकारणी करत असेल तर पालिकेच्या ऑडिटरशी तात्काळ संपर्क साधा असे आवाहन पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आपलं महानगरशी बोलताना केले.