खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण

शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (08:36 IST)
खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
 
नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती