ColdZyme असे या माऊथ स्प्रेचे नाव आहे. या स्प्रेने 20 मिनिटात 98.3 टक्के कोरोना विषाणू नष्ट होतो, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने २० जुलैच्या रिसर्चनंतर याबाबतचा अहवाल दिला आहे. एनजायमेटीका कंपनीने अमेरिकेतील मायक्रोबाक्स लॅबमध्ये आंतरराष्ट्रीय परिक्षणासाठी या स्प्रे चे संशोधन केले आहे.
ColdZyme हे औषध सर्दी, खोकल्यासाठीही वापरता येऊ शकते. या स्प्रे ने माणसाच्या शरीरातील अनेक प्रकारच्या विषाणूशी लढता येऊ शकते, असे मायक्रोबाक्स लॅबमधील परिक्षणातून समोर आले आहे.