महाराष्ट्रात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नवे रुग्णांची संख्या अधिक नोंदवली आहे. यामुळे सक्रिय रुग्ण संख्येत देखील वाढ झाली आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 8 हजार 535 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61 लाख 57 हजार 799 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 12 हजार 479 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 6 हजार 013 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.