महाराष्ट्र कोरोना:कोरोना रुग्णांमध्ये सुमारे 10 हजारांची घट, तर 122 नवीन ओमिक्रॉन रुग्ण

मंगळवार, 18 जानेवारी 2022 (10:28 IST)
रविवारच्या तुलनेत कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे . गेल्या 24 तासांत 31,111 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 24 जण मृत्युमुखी झाले  आहे. राज्यात कोरोनाचे 2,67,334 सक्रिय रुग्ण आहेत. 29,092 रूग्णांनी या आजारा वर मात केली आहे ही देखील दिलासादायक बाब आहे . महाराष्ट्रात रविवारच्या तुलनेत आज कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी झाली असली तरी ओमिक्रॉनचा धोका टळलेला दिसत नाही. आज राज्यात ओमिक्रॉनच्या 122 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाच्या नवीन बाधित रुग्णांची संख्या 1860 वर पोहोचली आहे.
रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 41 हजार नवे रुग्ण आढळले असून, 29 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सोमवारी संसर्गाच्या रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून बाधितांचा आकडा 40 हजारांच्या पुढे जात होता, मात्र आज सुमारे 10 हजारांची घट होऊन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी मुंबईत संसर्गाची प्रकरणे सातत्याने कमी होत असल्याची एक दिलासादायक बातमी आहे.

रविवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या फक्त 8 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, मात्र आज हा आकडा 122 वर पोहोचला आहे. ओमिक्रॉनवर शुक्रवारी आणि शनिवारी 100 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यात रविवारी मोठी घट झाली. मात्र, आज पुन्हा एकदा हा आकडा 100 वरून 122 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत संसर्गाचे 31 हजार 111 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 29092 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती