२४ तासांत ४३ हजार २११ नव्या कोरोनाबाधितांची वाढ

शनिवार, 15 जानेवारी 2022 (08:40 IST)
कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून आली. मात्र दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ४३ हजार २११ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७१ लाख २४ हजार २७८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज राज्यात दुसऱ्याबाजूला २३८ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली असून एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १ हजार ६०५वर पोहोचली आहे. सध्या राज्यात २ लाख ६१ हजार ६५८ सक्रीय रुग्ण आहेत.
आज दिवसभरात राज्यात ३३ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ६७ लाख १७ हजार १२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२८ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी १५ लाख ६४ हजार ७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७१ लाख २४ हजार २७८ (९.९६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ लाख १० हजार ३६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९ हजार २८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज पहिल्यांदाच २३८ एवढे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. आज पुणे मनपामध्ये १९७, पिंपरी चिंचवडमद्ये ३२, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई प्रत्येकी ३, मुंबई २ आणि अकोला १ असे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती