औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा, ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश

रविवार, 28 मार्च 2021 (10:06 IST)
राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. प्रमुख शहरांमध्ये तर दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत.
 
लॉकडाउन काळात किराणा दुकान, दूध-भाजी विक्री देखील दुपारी १२ पर्यंतच सुरू राहणार. त्यानंतर हे सर्व बंद राहणार आहे.लॉकडाउन काळात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार आहे. याचबरोबर खासगी, सरकारी, सर्व वाहनांना बंदी असणार आहे. जलंतरण तलाव, जिम, हॉटेल्स, मंगलकार्यालयं, सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी असणार आहे.
 
शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहणार आहेत. तर, ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत. याशिवाय, हॉटेलमधील आसनव्यवस्थेसह जेवणाची सूविधा (डायनिंग)बंद राहील मात्र निवासी असलेल्या यात्रेकरूना त्यांच्या खोलीमध्ये भोजनव्यवस्थेस परवानगी राहणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती