कडक लॉकडाऊन संपताच कोल्हापूरकर पुन्हा रस्त्यावर...

सोमवार, 27 जुलै 2020 (22:57 IST)
आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊन नंतर शहरात आज नागरिकांनी मोठी गर्दी केली. भाजी मंडई, बँका, सरकारी कार्यालय व अन्य वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. आठ दिवसाच्या कडक लॉक डाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आज मात्र विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत होते. 
 
कोल्हापूर (Kolhapur Corona Updates) महानगरपालिकेची अनेक वाहने लाऊडस्पीकरवरून गर्दी करू नका, तोंडाला मास्क लावा असे आवाहन करत शहरभर फिरत आहेत. चौकाचौकात वाहतूक शाखेचे पोलीस केएमटीचे कर्मचारी नागरिकांना मास्क लावण्याचे आव्हान करत आहेत. 
 
कोरोनाचा कहर शहरात सुरू असल्याने आणि एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने कडक लॉक डाऊन संपले असले तरी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले दैनंदिन व्यवहार पार पाडायचे आहेत असे आव्हान महापालिकेने (Kolhapur Mahapalika) केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती