धारावीत काल ४२ नवे रुग्ण सापडल्याने धारावीतील रुग्णसंख्या १५८३वर पोहोचली आहे. धारावीत आज बलिगा नगर, साथी हौसिंग सोसायटी, होळी मैदान, पंचशील सोसायटी, मंगल कैलाश बिल्डिंग, शास्त्रीनगर, भीम नगर, म्युनिसिपल चाळ, मेघवाडी, शांती नगर, धारावी क्रॉस रोड, पीएमजीपी कॉलनी, संघम गल्ली, ढोरवाडा, प्रेम मिलन बिल्डिंग, प्रगती नगर, शेठवाडी चाळ, महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, सोशल नगर, वैभव सोसायटी, कल्पतरू बिल्डिंग, सिता निवास चाळ, राजीव गांधी नगर, कोल्हापूर लेन आणि धारावी मेन रोड येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर शाहू नगर आणि रजीब अली चाळ येथे प्रत्येकी दोन, कुंभारवाडा येथे ५ आणि माटुंगा लेबर कँम्प येथे ८ रुग्ण सापडले आहेत.42 new #COVID19 positive cases have been reported in Mumbai's Dharavi area today, taking the total number of cases to 1583. No death has been reported today: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra
— ANI (@ANI) May 25, 2020