चीनच्या शांघायमध्ये कोविडची प्रकृती गंभीर, आणखी 7 जणांचा मृत्यू ,21जणांची प्रकृती गंभीर

मंगळवार, 19 एप्रिल 2022 (12:20 IST)
कोरोना व्हायरसमुळे चीनची स्थिती बिकट आहे. चीनच्या शांघाय शहरात कोविडमुळे आणखी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. कोविडच्या या नव्या लाटेत शांघायमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शांघायच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा अहवाल दिला आहे.
 
मागील आठवड्याच्या तुलनेत शांघायमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये घट होऊनही शहरातील ताज्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. शांघाय आरोग्य प्राधिकरणाचे अधिकारी वू कियान्यु यांनी नोंदवले आहे की 3,084 स्थानिक प्रकरणे आणि 17,332 स्थानिक लक्षणे नसलेल्या संसर्गाची नोंद झाली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, 26 फेब्रुवारी ते 18 एप्रिलपर्यंत शहरात 27,613 स्थानिक पुष्टी झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि 21,717 रूग्ण रुग्णालयात दाखल आहेत, त्यापैकी 21 जणांची प्रकृती गंभीर आहे.
 
चीनच्या आर्थिक केंद्र शांघायमध्ये कोविडमुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. प्रशासनाने अतिशय कडक लॉकडाऊन लागू केले असून, त्यामुळे पुरवठा समस्यांसह व्यवसायावरही वाईट परिणाम होत आहे. प्रशासनाने कोविडची लागण झालेल्या लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे आणि न्यूक्लिक अॅसिडद्वारे चाचणी केली जात आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती