गेल्या 24 तासात पुन्हा राज्यात कोरोनाची 28,699 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर 13,165 लोक बरे झाले आहेत.कोरोनामुळे 132 लोक कोरोनाला बळी पडले.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे वाढते प्रकरण लक्षात घेता राज्य सरकार अत्यंत सावध झालीअसून, त्या दृष्टीने पुन्हा एकदा जंबो कोरोना केंद्रे सक्रिय केली जात आहेत.जी नुकतीच सुरु करण्यात आली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी म्हटले होते की, 'कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यासाठी आम्हाला अधिक सज्ज असणे आवश्यक आहे.
कोरोनाचे झपाट्याने वाढते प्रकरण लक्षात घेता सरकारने पुन्हा एकदा लसीकरणाच्या नियमात बदल केले आहेत. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व लोक लसीकरण करण्यास सक्षम असतील. याआधी, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच लसीकरण केले जात होते ज्यांना आधीच कोणताही आजार आहे.