कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, पुणे, महाराष्ट्रात कोरोनाचे आज किती रुग्ण?

मंगळवार, 23 मार्च 2021 (16:48 IST)
राज्यामध्ये 22 मार्च रोजी 24,645 नवीन रुग्णांची नोंद झालीय. राज्यातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाखांपेक्षा जास्त झालीय.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 25 लाख 04 हजार 327 एवढी झाली आहे.
राज्यात सोमवारी (22 मार्च) 19,463 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर कोरोनामुळे 58 मृत्यूंची नोंद झाली.
मुंबईमध्ये सोमवारी 3262 नवीन रुग्णांची नोंद झाली.
पुणे महापालिका क्षेत्रात 2,365 तर नागपूर महापालिका क्षेत्रात 2,741 रुग्णांची नोंद झाली.
राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 89.22 % आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचा रिकव्हरी रेट कमी होताना दिसतोय.
सध्या महाराष्ट्रात 2 लाख 15 हजार 241 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूंचा आकडा 53 हजार 457 वर पोहोचला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती