आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅपचा नवा विक्रम

गुरूवार, 16 एप्रिल 2020 (15:09 IST)
कोरोना विषाणूला हरवण्यासाठी देशातील जनतेने आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करावे, तसेच इतरांनाही डाउनलोड करण्यास सांगावे असे आवाहन केल्यानंतर या अ‍ॅपने एक नवीन विक्रम केला आहे. अवघ्या 13 दिवसात तब्बल 5 कोटी लोकांनी हा अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

भारत सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना ट्रॅक करण्यासाठी  आरोग्य सेतू अ‍ॅप काही दिवसांपूर्वीच लाँच केले होते. या अ‍ॅपचा आता जगात सर्वाधिक डाउनलोड होणार्‍या अ‍ॅपमध्ये समावेश झाला आहे, अशी माहिती नीती आयोगाने आपल्या अहवालातून दिली आहे.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना हे अ‍ॅप डाउनलोड करा असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर अवघ्या 24 तासात 11 मिलियन लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅपने पोकेमॉन गो गेमिंग अ‍ॅपचा रेकॉर्ड मोडला आहे. 2016 साली पोकेमॉन गो गेमिंग अ‍ॅपला 19 दिवसांत 5 कोटी लोकांनी डाउनलोड केले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती