सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त

गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (08:45 IST)
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. राज्यात  सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त निघाली आहे. राज्यभरात बुधवारी  १८ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित आढळले, तर १९ हजार १६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. याचबरोबर  ४८१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७८.६१ वर पोहचला आहे.
 
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १३ लाख ८४ हजार ४४६ वर पोहचली आहे. ज्यामध्ये २ लाख ५९ हजार ३३ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १० लाख ८८ हजार ३२२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ३६ हजार ६६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.
 
सध्या राज्यात २१ लाख ६१ हजार ४४८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, २९ हजार १७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती