बाबरी विध्वंसप्रकरणी आज सीबीआय कोर्टात अंतिम निर्णय

बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (10:07 IST)
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात लखनौचे विशेष सीबीआय न्यायालय आज अर्थात 30 सप्टेंबर रोजी निर्णय देणार आहे. न्यायालयाने सर्व 32 मुख्य आरोपींना कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरलीनोहर जोशी आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे.

दरम्यान, न्यायालयाने आजच्या सुनावणीसाठी ज्येष्ठ नेत्यांना अनुपस्थित राहण्यास सूट दिली आहे. या आधी 22 ऑगस्ट रोजी सुनावणीचा कालावधी एक महिनने वाढवून 30 सप्टेंबरर्पंत मुदत देण्यात आली होती. सीबीआयने आरोपींविरोधात 351 साक्षीदार आणि 600 दस्तऐवज सादर केले आहेत. तसेच 400 पानी युक्तिवादही दाखल केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती