लसीचे दोन डोस घेतलेल्यानंतरही २६ जणांना कोरोना

मंगळवार, 29 जून 2021 (07:49 IST)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कोविडला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे दोन डोस घेतलेल्यानंतरही कोरोना होणाऱ्या २६ रुग्णांचा समावेश आहे. तर पहिला डोस घेतलेल्या दहा हजार ५०० नागरिकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. 
 
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. आतापर्यंत सात लाख २० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. कोविड १९ ला प्रतिबंध करणारी लस देण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. त्याच दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. या काळात बाधित रुग्णांची दररोजची संख्या थेट दहा हजारांवर पोहोचली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती