हवाई प्रवासासाठी हे नियम असतील
– विमान उड्डाणाच्या नियोजितवेळेच्या दोन तास आधी प्रवाशांना विमानतळावर पोहोचावे लागेल.
– प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्हज घालणे बंधनकारक असेल.
– पुढच्या चार तासांनी ज्यांचे विमान आहे, त्यांनाच फक्त टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश दिला जाईल.
– टर्मिनलमध्ये प्रवेश करण्याआधी सामानाचे सॅनिटायझेशन केले जाईल.
– काऊंटरवरील स्टाफला फेस शिल्ड घालावे लागेल किंवा काच मध्ये आवश्यक आहे.
– सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांबद्दल सातत्याने घोषणा केल्या जातील.
– एअरपोर्ट स्टाफला पीपीई किट बंधनकारक आहे तसेच कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सॅनिटायझर ठेवावे लागेल.