बुलडाण्यात सोमवारपर्यत संचारबंदी

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (21:17 IST)
बुलडाण्यात कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी वाढतांना दिसत आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात ३९१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. गेल्या दहा दिवसात एकूण २ हजार ९५३ कोरोनाबाधित आढळले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १७,९७९ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यातून १५,२५८ रूग्ण कोरोनामुक्त झाले .तर १९२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भाव पाहता जिल्हादंडाधिकारी यांनी शुक्रवार दि. २६ सायं ५ वाजेपासून सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. या काळात केवळ दवाखाने आणि मेडिकल उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तर दुध विक्रेत्यांना सकाळ-सायंकाळ दोन तासांची सूट दिली आहे. या खेरिज सर्व बाजारपेठ पूर्णपणे  बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती