COVID-19 : काय मेंदूवरही हल्ला करत आहे व्हायरस

बुधवार, 29 एप्रिल 2020 (15:50 IST)
आज जेव्हा कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जगात थैमान पसरत आहे तेव्हा वैज्ञानिक याच्या प्रत्येक पैलूवर रिसर्च करत आहे. श्वसन तंत्रावर हल्ला करणार्‍या या व्हायरसला जगभरातील लाखो लोकं बळी पडले आहेत. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या या संसर्गाचा प्रभाव शरीरातील विभिन्न अवयवांवर कशाप्रकारे पडत आहे यावर शोध सुरू आहे. 
 
अलीकडेच चीनमध्ये कोरोनाचा मेंदूवर काय प्रभाव पडतो यावर शोध करण्यात आला असून रिपोर्ट काय म्हणते जाणून घ्या की काय खरंच कोरोना मानवी मेंदूवर आणि नर्व्हस सिस्टमवर अटॅक करत आहेत.
 
तसं तर SARS-CoV-2 ने संक्रमित लोकांद्वारे अनुभव करण्यात आलेल्या लक्षणांचे पूर्ण स्पेक्ट्रम अजून तयार झालेले नाही तरी अलीकडेच झालेल्या शोधात COVID-19 रुग्णांमध्ये आढळण्यात आलेल्या लक्षणांबद्दल अध्ययन केले गेले आहे. यात आढळले की कशा प्रकारे करोनाने रुग्णांच्या मज्जासंस्थेमध्ये गडबडीमुळे होणार्‍या रोगांची लक्षणे दर्शवली. 
 
हा शोध वुहानमध्ये रुग्णालयात दाखल COVID-19 रुग्णांवर झाले आहे. शोधकर्त्यांनी तपासणीत रोगाचे न्यूरोलॉजिकल बदल लक्षात घेतले. शोधकर्त्यांचं हे निष्कर्ष चीनच्या प्रसिद्ध न्यूरोलॉजी जर्नल जामामध्ये देखील प्रकाशित केले गेले आहेत. संशोधकांना रूग्णात कोविड 19 चे न्यूरोलॉजिकल लक्षणे ठराविक प्रमाणात आढळली आहेत.
 
संशोधकांनी 214 रुग्णांचे अध्ययन केले ज्यापैकी 36.4 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये सामान्य लक्षण जसे ताप, खोकला यांच्या तुलनेत न्यूरोलॉजिक लक्षणाचे प्रमाण अधिक होते, हे लक्षणं सामान्यतः: गंभीर संक्रमण असणार्‍या रुग्णांमध्ये आढळतात. संशोधकांनी या लक्षणांना तीन श्रेणीत वर्गीकृत केले. ज्यात प्रथम मध्यवर्ती मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होता, ज्याचे लक्षण चक्कर येणे, डोकेदुखी, दुर्बल चेतना (impaired consciousness), acute cerebrovascular disease, एटॉक्स‍िया (शरीराच्या संपूर्ण क्र‍ियाकलापांवरुन मेंदूचं नियंत्रण कमी होणे). या व्यतिरिक्त घन्नाटे येणे देखील सामील होतं.
 
या व्यतिरिक्त दुसर्‍या श्रेणीत पेरीफेरल नर्व्हस सिस्टम बघितले गेले. यात रुग्णांमध्ये स्वाद आणि गंध हानी, दृष्टी हानी आणि नर्व्हस पेन सामील करण्यात आले. आणि तिसर्‍या श्रेणीत स्क्लेटल मस्कुलर इंजरीचा शोध घेतला गेला. ज्यात कोरोना गंभीर संक्रमणानंतर मानवी मेंदूवर प्रभाव टाकू शकतो हे स्पष्ट आढळले. 
 
संशोधकांनी 214 रुग्णांवर अध्ययन केले होते ज्यापैकी 126 जणांना गंभीर संक्रमण नव्हतं जेव्हाकी 88 रुग्णांना गंभीर संक्रमण होतं. या शोधात आढळले की यापैकी एकूण 78 रुग्णांमध्ये कोविड 19 च्या प्रभावामुळे न्यूरोलॉजिकल बदल बघायला मिळाले.
 
यात लक्षात घेण्याची बाब म्हणजे नॉन सीवियरच्या तुलनेत गंभीर प्रकरणांमध्ये प्रभाव अधिक बघायला मिळाला. या रुग्णांमध्ये ताप-खोकला या ऐवजी उच्च रक्तदाब आणि इतर लक्षणं ‍दिसून आले. यात नर्व सिस्टमशी निगडित जसे तीव्र मस्तिष्कवाहिकीय रोग, दुर्बळ चेतना आणि स्केल्टल मसल्समध्ये मध्ये दुखापत होण्याची शक्यता दिसून आली.
 
उल्लेखनीय आहे की यापैकी काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसचे विशिष्ट लक्षणं नव्हे तर केवळ न्यूरोलॉजिकल लक्षणांमुळे दाखल झाले होते. नंतर तपासणीत ते करोना पॉजि‍टिव असल्याचे आढळले. या कारणामुळे देखील करोना व्हायरसच्या काही रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षण अधिक आढळले. 
 
हे लक्षात घेत संशोधकांनी सल्ला ‍दिला आहे की COVID-19 रुग्णांच्या न्यूरोलॉजिकल अभिव्यक्तीवर देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेष करून गंभीर संक्रमण असणार्‍या रुग्णांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अर्थात रुग्णाने ताप-खोकला याऐवजी हाय बीपी किंवा वरील सांगण्यात आलेल्या काही लक्षणांचा उल्लेख केल्यास त्यांची करोना चाचणीत करावी. कारण चीनमध्ये गंभीर रुग्णांमध्ये हे लक्षणं आढळत असून संशोधकांनी याची पृष्टी करत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती