करोना रोखणारी गादी: फर्निचर शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल

गुरूवार, 19 मार्च 2020 (10:07 IST)
‘अँटी करोना व्हायरस गादी’ची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून अफवा पसरवल्याप्रकरणी संबंधित फर्निचर शॉपचे मालक आणि व्यवस्थापकांविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. अरिहंत मॅट्रेसेसच्या मालकाने याबाबत १३ मार्च रोजी एका वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. करोना विषाणूला प्रतिबंध होईल अशी मॅट्रेसेस (गादी) बनवलेली आहे, अशा पद्धतीने जनतेच्या मनात गैरसमजूत निर्माण करणारी आणि दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या प्रकरणी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब डावखर यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती