देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १० लाखांवर पोहोचली

शुक्रवार, 17 जुलै 2020 (08:58 IST)
देशात कोरोना थैमान घालत असताना दररोज देशात हजारो नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. गुरुवारी देशातील एकूण रुग्णसंख्या १० लाखांवर पोहोचली आहे तर दिलासादायक बाब म्हणजे रुग्णांचा आकडा वाढता असला तरी कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वाढते आहे.
 
covid19india.org ने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात १० लाख २ हजार ७०७ रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत २५ हजार ५९५ रूग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. या कोरोनाबाधित एकूण रूग्णांपैकी ६ लाख ३५ हजार २४५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ३ लाख ४१ हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रूग्ण भारतात आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३२ हजार ६९५ कोरोनाबाधित रुग्णांचा वाढ झाली असून ६०६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २४ हजार ९१५ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
 
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा रेट ६३.२४ टक्के इतका आहेत. तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९६.०९ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच देशातील मृत्यूदर हा ३.९१ टक्के इतका आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती