लवकरच या वयाच्या लोकांचे लसीकरण होणार सुरु

गुरूवार, 11 मार्च 2021 (14:25 IST)
देशभरात आणि त्याहून महाराष्‍ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. तसेच सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढविला आहे. सध्या वॅक्सीनेशनचा तिसरा टप्पा सुरु आहे. यात ज्येष्ठ नागरिक (60 वर्षांपेक्षा अधिक) तसेच 45 ते 60 या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. आता लवकरच पुढील टप्पा सुरु होणार आहे.
 
पुढील टप्प्यात 50 वर्षांच्या वरील वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सूत्रांप्रमाणे कोणत्या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण कोणत्या टप्प्यात करायचे हे पूर्वीच ठरवण्यात आले आहे. कारण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात एकाच टप्प्यात वॅक्सीनेशन शक्य नाही. त्यामुळे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. 
 
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरु झाली होती. 1 मार्च पासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला. देशात दोन लशींच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यात सीरम इन्सिटट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे. लोकांना या दोन लशींपैकी एक लस निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला नाही. लसीकरण करण्यासाठी सरकारी सेंटर्ससह खासगी हॉस्पिटलला देखील परनावगी देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात 250 रुपयांना कोरोनाची लस मिळत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती