ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - रामराजे निंबाळकर

बुधवार, 16 जून 2021 (21:03 IST)
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळालं असलं तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत, अशा सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी दिल्या आहेत.कोरोना आढावा आणि नियोजन बैठकीदरम्यान बोलताना त्यांनी या सूचना दिल्या आहेत.
फलटणमध्ये 200 बेडचं जम्बो कोव्हिड हॉस्पिटल उभाण्याबाबतचा निर्णय घेऊन पुढच्या 15 दिवसांत हे हॉस्पिटल उभारण्याच्या सूचनाही या बैठकीदरम्यान देण्यात आल्या.
 
ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या कोरोना सेंटर्समध्ये रुग्ण नाहीत म्हणून ही उपचार केंद्र बंद न करण्याच्या सूचना निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती