लालूप्रसाद यादव यांना कोरोनाचा धोका?

शनिवार, 18 एप्रिल 2020 (12:08 IST)
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा रुग्णालयातील वॉर्ड बदलण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. लालू यादव यांना प्रकृती अस्वास्थमुळे तुरुंगातून हलविण्यात आले आहे. यामुळे आरजेडीचे कार्यकर्ते   आणि हितचिंतकांना चिंता सतावू लागली आहे. आजारी लालूप्रसाद यांना कोरोनाची तर लागण होऊ नेय, याची चिंता पक्ष आणि कार्यकर्त्यांना सतावते आहे. याच कारणामुळे लालू यादव यांना रिम्समध्येच दुसर्‍या  वॉर्डात हलविण्यात यावे अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दरम्यान, पेरोलसाठी किंवा लालू यादव यांचा वॉर्ड बदलण्याबाबत कोणताही अर्ज देण्यात आला नसल्याचे लालू यादव यांच्या वकिलाने सांगितले.

झारखंडमधील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने रांचीच्या रिम्समध्ये दाखल झालेल्या लालू यादव यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती आरजेडी नेत्यांना वाटत आहे त्यामुळे लालू यादव यांना दुसर्‍या वॉर्डात हलविण्यात यावे, अशी मागणी होत आहे. याचे कारण म्हणजे लालू प्रसाद असलेल्या वॉर्डाजवळ कोरोना सेंटरही बनवले गेले आहे. अशा परिस्थितीत लालू यादव यांना संसर्ग होऊ नये या चिंतेमुळे त्यांचे चाहते आणि त्यांच्या कुटुंबीयांना चिंता सतावू लागली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती