कोरोनाची तपासणी खासगी लॅबमध्ये मोफत करावी : सुप्रीम कोर्ट

बुधवार, 8 एप्रिल 2020 (16:12 IST)
देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आता त्यावर सुप्रीम कोर्टानेही चिंता व्यक्त केली आहे. जास्तीत जास्त लोकांना उपचार मिळावे, त्यात दिरंगाई होऊ नये, पैशाअभावी कोणीही उपचाराशिवाय राहू नये, या अनुषंगाने आज सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाच्या सुचना मोदी सरकारला दिल्या आहेत.

कोविड-१९ ची तपासणी ही खासगी लॅबमध्ये मोफत केली जावी, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटले असून तसेच ज्या लोकांकडून त्यांनी पैसे घेतले आहेत, त्यांना ते सरकारने परत करण्याची व्यवस्था करावी, हेदेखील कोर्टाने यावेळी नमूद केले. तर यावर केंद्र सरकार याचा नक्की विचार करेल, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती