एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

शनिवार, 4 एप्रिल 2020 (12:27 IST)
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ अ‍ॅपने आपली सेवा काही काळासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार हा नवा प्रयोग एचबीओने सध्या तरी प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. त्यामुळे प्रेक्षक ५०० मिनिटांपर्यंत या अ‍ॅपचा मोफत आनंद घेऊ शकतात. या नव्या योजनेमुळे ‘द सोप्रानोस’, ‘सिक्स फीट अंडर’, ‘द वायर’, ‘बॅरी’, ‘ट्रू ब्लड’, ‘सिलीकॉन वॅली’ यांसारखे अनेक लोकप्रिय शो फ्रीमध्ये पाहाता येतील.
 
एचबीओ हे एक ऑनलाईन अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर आपण नेटफ्लिक्स किंवा अ‍ॅमेझॉन प्राईमप्रमाणेच वेब सीरिज किंवा चित्रपट पाहू शकतो. या अ‍ॅपचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला काही ठरावीक रिचार्ज करावा लागतो. मात्र लॉकडाउनच्या काळात या अ‍ॅपचा वापर मोफत करता येईल. यापूर्वी अशीच काहीशी सेवा ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ व ‘झी ५’ या अ‍ॅप्सने देखील सुरु केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती