करोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात

शनिवार, 13 जून 2020 (17:00 IST)
राज्य सरकारनं करोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात करोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात खासगी लॅबला दणका दिला आहे. दुसरीकडे सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळला आहे.
 
यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, “खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या करोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी ४५०० रुपये इतके होते, ते आता २२०० रुपये घेतले जाईल. कमी कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल,” असं टोपे म्हणाले.
 
“व्हीटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क असेल. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं,” असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, आयसीएमआरने २५ मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून त्यांच्या राज्यात दर निश्चिती करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कर्नाटक ने करोना चाचणीसाठी २२५० रुपये दर निश्चित केला तर तामिळनाडू ने २५०० रुपये व जम्मू- काश्मीर मध्ये २७०० रुपये दर निश्चित करण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती