राज्यात कोरोनामुळे 960 रूग्ण ,मृत्युमुखी नवीन प्रकरणे कमी झाली!

शनिवार, 15 मे 2021 (22:42 IST)
राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये नक्कीच घट झाली आहे, परंतु मृत्यू होणाऱ्या आकड्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. शनिवारी कोरोना विषाणूमुळे राज्यात 960 लोक मृत्यमुखी झाले. राज्यात कोरोना विषाणूंमुळे एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूची 34848 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. शनिवारी कोरोना विषाणूपासून 59073 लोक बरे झाले.
 
मुंबईतील कोरोनाच्या नवीन प्रकरणात दिवसेंदिवस घट होत आहे. मुंबईत शनिवारी कोरोना विषाणूचे 1147 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, नवीन प्रकरणांच्या तुलनेत, 2333 रुग्ण बरे देखील झाले आहेत आणि 62 लोक मरण पावले आहेत.
 
नव्या प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर शहरातील सक्रिय रुग्णांची संख्याही आता कमी होऊ लागली आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 36,674 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील 634315 लोक कोरोना विषाणूपासून बरे झाले आहेत.  शहरात आतापर्यंत या महामारीमुळे 14200 लोक मरण पावले आहेत. तर शुक्रवारी मुंबईत कोरोना विषाणूची 1657 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर 2572 लोक बरे झाले.
 
 ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूची 1,697 नवीन घटनांसह, संक्रमणाची एकूण संख्या 497810 पर्यंत वाढली आहे. शुक्रवारी ही सर्व प्रकरणे नोंदविण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. जिल्ह्यात या साथीच्या आजाराने  59 लोका मृत्युमुखी झाले . यासह मृतांची संख्या वाढून 8370 झाली आहे. 
 
ठाण्यात कोविड -19 मृत्यू दर 1.68 टक्के असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शेजारच्या पालघर जिल्ह्यात कोविड 19 चे प्रमाण वाढून 101857 झाले आहे, तर मृतांची संख्या1835 झाली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती